समीररावं, श्रध्दा भक्ती वैगेरे गोष्टी मनांशी निगडित असल्यामुळे 'वस्तुनिष्ठते'ची नेमकी व्याख्या करता येणे शक्य नाही.

मला वाटत की श्रद्धा व भक्ती या मध्ये सुद्धा वस्तुनिष्ठता असू शकते. स्वामी विवेकानंदांची गोष्ट सर्वांना ठाऊक आहेच. स्वतः च्या गुरूंची सुद्धा त्यांनी परीक्षा घेतली होती आणि मगच त्यांची श्रद्धा दृढ झाली.

एखाद्या माणसावरचा विश्वास - श्रद्धा ही अचानक हवेतून निर्माण होत नाही. त्या मागे काही विचार, काही अपेक्षा असतेच. आपण एखाद्या व्यक्ती/ वस्तू वर का विश्वास ठेवत आहोत? हा विचार जर वस्तुनिष्ठ पद्धतीनी केला तर आपण भोंदू जादूगारांना "जगदगुरू" मानणार नाही. माणसाच्या आध्यात्मिक गरजा भागवण्या साठी त्याला एखाद्या गुरू किंवा गाईडची गरज भासते. अशावेळी एखाद्या candidate guide चे मोजमाप वस्तुनिष्ठतेने केले तर भोंदू जादूगारांचा धंदा बुडायला फार वेळ लागणार नाही.

गीतेत सुद्धा गुरू कडून ज्ञान कसं घ्यावं हे सांगताना "परिप्रश्नेन सेवया" * (म्हणजे अनेक प्रश्न विचारून) असं सांगितल आहे. वस्तुनिष्ठ विचार करण्याची मनाला सवय लावणं हा शिक्षणाचा महत्त्वाचा भाग असायला हवा. आपली शिक्षण व्यवस्था यात कमी पडते आहे अस वाटत. असो पाल्हाळ फार झालं. आपल्या प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद.