मूळ भाषेतील उच्चाराप्रमाणे लेखन व्हावे या मताशी सहमत.

कदाचित हे विषयांतर होईल; पण सातारा, लोणावळा या व अशा 'आकारान्त' ग्रामनामांचे लेखन मूळ भाषेप्रमाणे करणे आता स्वीकारले जाईल का? कारण ही नावे मुळची सातारे, लोणावळे अशी होती हेच आता आपण विसरून गेलो आहोत. 'पुणे'चेही इंग्रजांनी 'पुना' असे आकारान्तच केले होते. मराठी नावांचा शेवट अकारान्त, एकारान्त वा ईकारान्त होतो, आकारान्त नाही.

अवधूत.