गरीब देशांतील गरीब वाचकांना परवडतील अशा किमतीत ही पुस्तकं विकल्यास आम्हालाही विकत घेऊन वाचायला आवडेल. पण इथेही ती पुस्तकं प्रगत व समृद्ध देशांच्या किमतीत विकल्यास 'पायरसी' होणारच (छापील/इलेक्ट्रॉनिक). हीच कथा सॉफ्टवेरची.
जास्त किमतींत कमी वस्तू विकण्यापेक्षा कमी किमतीत जास्ती वस्तू विकणे शहाणपणाचे ठरावे असे वाटते. दिवसाच्या शेवटी जमाखर्च मांडला असता दोन्ही प्रकारातून आलेल्या नफ्यात फार फरक नसावा असे वाटते.