त्यात ट चा हलकासा उच्चार नाही काय? मी बीबीसीवर ऐकल्यासारखा वाटते.

(स्थानिक उच्चाराप्रमाणे) दुसऱ्या 'टी'चा उच्चार अतिहलका म्हटलं तर आहे, पण जवळजवळ अनुच्चारितच म्हणायला हरकत नाही इतका हलका आहे - बऱ्याचदा लोपच पावण्याकडेच कल आहे.

अटलँट् असे लिहायचे झाल्यास हलन्त मराठीतून बाद झाला आहे. नवा उपाय/चिन्ह हवे.

अटलँट् असे लिहायचे ठरवले तरीही चूक ठरेल... शेवटचा 'ए' अतिऱ्हस्व आहे, पण अनुच्चारित नाही! कदाचित अटलॅ(ऽ)णः हे तडजोड म्हणून चालू शकले असते, पण मराठीत विसर्गाचा उच्चार हमखास चुकीचा होतो. त्यामुळे नवा उपाय हवा, हे खरेच! :-)

पण मग कशाला एवढे कष्ट घ्यायचे? मराठीत लिहिताना सरळसरळ 'अटलांटा' असे मराठमोळे लिहिले तर काय बिघडले?

- टग्या.