माझ्यामते इथे 'तंत्रज्ञानाची प्रगती कितपत बरोबर ?' असा मुद्दा प्रसिद्ध करावयास हवा होता.....(मला मध्ये बरेच गुद्दे मिळाले अनुभवी मनोगतींकडून ! ;) )
धन्यवाद विक्रम जाधव आणि महेश शिऊरकर यांना !
तर माझ्यामते आपण आणखीन तंत्रज्ञानाची प्रगतीकरून काय साधणार आहोत? कशाला हवेत हे tv channels? internet? जे माणसांमाणसामधे दुरावा आणत आहेत. मुले खेळखेळत नाहीत... लोकांना शेजारी कोण राहतो माहीत नाही... बाबांना मुलांशी मोकळेपणाने बोलायला वेळ नाही. सगळे पैशापायी इकडेतिकडे धावत आहेत...
माणसाची सोय करणारे हेच तंत्रज्ञान नवनवीन हिंसक साधने (अणुबाँब) बनवित आहेत... लोक किड्यामुंग्यासारखी मरत आहेत..ऐन चाळिशीत ह्रदयरोगाने मरत आहेत...
माझ्यामते पुर्वी गावात जी संस्कृती होती.. ज्यात पैशाला महत्व नव्हते... तीच फार उत्तम होती. लोक दिवसभर कष्ट करून यायचे.. एकमेकांशी गप्पा व्हायच्या... tinned food ऐवजी नैसर्गिक खायचे... मग निवांत झोपी जायचे.. (झोपेच्या गोळ्या खाऊन नव्हे...)
अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. चुकभुल द्यावी घ्यावी.