तर माझ्यामते आपण आणखीन तंत्रज्ञानाची प्रगती करून काय साधणार आहोत?

१९व्या शतकाच्या शेवटी शेवटी अशी आवई होती की, पदार्थविज्ञानात जे काही शोधून काढायचे आहे ते शोधून झाले आहे. पण त्यानंतर अणुसंशोधन झाले, आणि अणुरचनेचे कोडं जसजसे उलगडत गेले तसे अनेक नवीन शोध लागत गेले.

कशाला हवेत हे tv channels? internet?

या सर्वांना 'चालू-बंद' करण्याची सोय आहे. आपल्याला कधी बंद करावे हे कळत नसेल तर दोष विज्ञानाला देऊ नये असे वाटते.

माणसाची सोय करणारे हेच तंत्रज्ञान नवनवीन हिंसक साधने (अणुबाँब) बनवीत आहेत

तंत्रज्ञानाच्या (विशेषतः आधुनिक) विकासाचे मूळ हे अनेकदा सैन्यासंबंधी विकासात दडले असल्याचे दिसून आले आहे. त्यात नवीन ते काय? आर्केमिडीजने अंतर्वक्र आरसे युद्धात वापरले होते (असे वाचले होते). म्हणून त्याचे संशोधन थांबवायचे की काय? अणुबाँब बनवण्यासाठी आज विकसीत झालेले तंत्रज्ञान किती उपयोगी आहे हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. कारण असे अस्त्र ६० वर्षांपूर्वी बनले आणि वापरले आहे.

... लोक किड्यामुंग्यासारखी मरत आहेत

ती आधीही मरत होतीच. फक्त कारणे वेगळी होती. उलट विज्ञानाच्या प्रगतीमुळे उगाच कुठल्याही किरकोळ रोगाच्या साथीत हजारो लोक मरायचे ते बंद झाले आहे.

..ऐन चाळिशीत हृदयरोगाने मरत आहेत...

बैठे काम करत असाल तर दिवसातून तासभर व्यायाम करावा! सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, हे तत्त्व एकप्रकारे इथेही लागू होते.

माझ्यामते पूर्वी गावात जी संस्कृती होती.. ज्यात पैशाला महत्त्व नव्हते...

"तुम्हाला पैशाला बिलकूल महत्त्व नव्हते" असे म्हणायचे आहे की "पैशाला आजच्याइतके महत्त्व नव्हते" असे म्हणायचे होते? तसेच तेव्हाची समाजरचना आणि आजची समाजरचना वेगवेगळ्या आहेत असे वाटत नाही का?

तीच फार उत्तम होती.

हे एकतर्फी अनुमान आहे असे वाटते. लोहाराचा मुलगा लोहार, वैद्याचा मुलगा वैद्य आणि पुजाऱ्याचा मुलगा पुजारी असे चालले असते का?

लोक दिवसभर कष्ट करून यायचे..

आजही करतात.

एकमेकांशी गप्पा व्हायच्या...

हे आजही करता येऊ शकते. इच्छा हवी.

tinned food ऐवजी नैसर्गिक खायचे...

आम्हीतरी अजूनही नैसर्गिकच खातो. आमच्या घरात टिन्ड फूड येत नाही.

मग निवांत झोपी जायचे.. (झोपेच्या गोळ्या खाऊन नव्हे...)

विपर्यास केलेला मुद्दा. जुन्या काळी सर्वांनाच पडताक्षणी गाढ झोप लागायची आणि आजच्या दिवसात सर्वजण झोपेच्या गोळ्या खाऊन झोपतात हा आपला गोड गैरसमज आहे असे वाटते. योग्य काळजी घेतल्यास औषधांची गरज कमी किंवा शून्य होऊ शकते.