लेख छान आहे. मी इथे US मध्ये माझ्या अनेक अमराठी मित्रांकडून अशीच मते अधी देखील ऐकली आहेत. त्यातली काही पटतात काही पटत नाहीत.
आतिथ्य, मौजमजा, कपडे हे सर्व ठीकाणी वेगळे असणारच त्यात "आमचं चांगलं तुमचं वाईट" याला अर्थ नाही. आणि सर्वच जर एक समान वागू लागल तर कस होणार.. मग या लेखाची गरजचं नव्हती.
तीच गत भाषेची... माझा एक मित्र मला कायम म्हणायचा की "तेरी हिंदी भी मराठी जैसी लगती है, आप आईये की बजह... "ए तुम इधर आओ"...जरा हिंदी तो ठीकसे बोला कर"....
"कुत्ते की तरह आधी रोटी खिलाते हो" हे तर मी पण अनुभवलं आहे. पण जसं त्याला तो कंजूष पणा वाटला तसं मला त्यांच्या पाहूणचारात अवास्तव डामडौल पण वाटू शकतो. माझ्या लग्नाचे फोटो पाहून एकजण म्हणाला, "यार तुम लोग शादी में भी खर्चानही करते हो". पण तसंच मला त्यांच्या (मध्यप्रदेशी) लग्नात "ऋणं कृत्वा घृतं पिबेत" दिसतं... दहेज साठी अमेरिकेतल्या सर्व प्रसिद्ध स्थळांवर फोटो काढून "यार अपना भाव बढता है" असं म्हणत ते फोटो मायदेशी पाठवणारे महाभाग पण भेटले.
पण एकंदर "attitude" च्या बाबतीत काही मतं खूप पटली. आपण रिस्क कमी घेतो... स्थैर्य जास्त पसंत करतो हे पटलं.. यात मला एकच मुद्दा विशेषतः पटला तो म्हणजे: "आपण मनातून सुखी असू तर प्रश्नच मिटला"...