लोण्याचे तूप करायची कृति रोहिणीताईंनी छानच दिली आहे.  काही माझ्या अनुभवाच्या टीपा

  1. लोणी शक्यतो आधी बाहेर पातेल्यात काढून मऊ होऊ द्यावे.  शीतकपाटातून २ तास बाहेर ठेवले तरी चालेल.
  2. आंच मध्यमच ठेवावी.  नाही तर लोणी भांड्याच्या काही भागाला चिकटून करपू लागते.
  3. वर सांगितल्याप्रमाणे पिवळे होऊन लोण्याचे पूर्ण तुपात परिवर्तन झाले की लगेच ते भांडे/पातेले पाणी भरलेल्या दुसऱ्या परातीत किंवा पसरट भांड्यात पाणी घेऊन तुपाच्या भांड्याचे बूड त्वरित गार करावे.  नाही तर आचेवरील ऊष्णतेने झालेले तूप जळून/करपून काळे होते.

कलोअ,
सुभाष