शिवधर्मात देवांना स्थान नाही...

विठ्ठ्लाला आमचा विरोध नाही...

शिवधर्मात आल्यानंतर जर कुण्या कुणाला जर आंतरजातीय विवाह करावयाचा असेल तर त्यांना प्रोत्साहनच दिल्या जाईल............

शिवश्री.. आपली वरील विधाने परस्पर विरोधाभास असणारी आहेत.

शिवधर्मात देवांना स्थान नसेल तर विठोबा कसा काय चालतो? जिजामातेने शिवाजी महाराजांना लहानपणी देवादिकांच्या गोष्टी सांगितल्या असे वाचले होते. जिजामातेला जे देव मान्य होते ते तरी तुम्हाला मान्य आहेत का? "हर हर महादेव" मधला महादेव पण मान्य नाही का? आणि श्रींच्या इच्छेने स्वराज्या स्थापिले ते श्री तरी मान्य आहेत का?

विठोबा तर श्रीकृष्णाचा अवतार आहे... आणि श्रीकृष्ण भगवदगीते मध्ये.. "चातुर्वर्ण्य मया प्रोक्ता" (चातुर्वर्ण्य व्यवस्था मी निर्माण केली) अस म्हणुन गेला. असा मनूवादी देव कसा चलेल?

आणि जात पात वगैर निर्माण करणाऱ्या मनूवादी ब्रह्म्णांच धर्म सोडून जर तुम्ही नवीन धर्म स्थापताय तर त्यातसुद्धा तुम्ही जात पात राहू देणार? मला वाटलं की शिवधर्मात प्रवेश केल्यावर जातपात विसरून सर्व समान होतील. मग आंतरजातीय विवाहाचा विषय येतोच कुठे? का तुम्ही शिवधर्मीय आणि इतर धर्मीय यांच्या विवाहा संबंधी बोलत आहात?