माझ्यामते आपण आणखीन तंत्रज्ञानाची प्रगतीकरून काय साधणार आहोत?
हं! पाऊस पडत नाही म्हणून नवस बोलूया. पाणी अडवून धरणे बांधण्यापेक्षा पुरात वाहून जाऊया. जगाला जवळ आणण्यापेक्षा आपल्या विहिरीत कूपमंडुक बनून राहूया. वैज्ञानिक दृष्ट्या मानवी शरीर एकच असते असे मानण्यापेक्षा गोरे काळे असे भेद करूया. प्लेग ने लोक मरु द्यात. चिकुनगुन्याने मरत आहेतच, कशाला करायचे संशोधन, चला तेवढीच लोकसंख्या कमी.
कशाला हवेत हे tv channels? internet? जे माणसांमाणसामधे दुरावा आणत आहेत. मुले खेळखेळत नाहीत... लोकांना शेजारी कोण राहतो माहीत नाही... बाबांना मुलांशी मोकळेपणाने बोलायला वेळ नाही. सगळे पैशापायी इकडेतिकडे धावत आहेत...
हा माणसाचा हव्यास की विज्ञानाचा दोष? "अति तेथे माती" हा नियम सर्वत्रच लागू आहे.
लोक किड्यामुंग्यासारखी मरत आहेत..ऐन चाळिशीत ह्रदयरोगाने मरत आहेत
पूर्वी मरत नव्हते की काय? रोगातही मरत होते, लढाईतही मरत होते आणि अज्ञानातही मरत होते.
माझ्यामते पुर्वी गावात जी संस्कृती होती.. ज्यात पैशाला महत्व नव्हते... तीच फार उत्तम होती. लोक दिवसभर कष्ट करून यायचे.. एकमेकांशी गप्पा व्हायच्या... tinned food ऐवजी नैसर्गिक खायचे... मग निवांत झोपी जायचे.. (झोपेच्या गोळ्या खाऊन नव्हे...)
हो आणि बलुतेदारीत जाती होत्या. आरक्षणे नव्हती. लोक निमूट आपली जात पाळत. वर्णभेद पाळत. एक जात स्वतःला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ मानत असे. बायका चूल आणि मूल सांभाळत. हं! करून पाहायला बऱ्याचजणांची हरकत नसेल कदाचित ... माझी आहे.