(२.१) आणि (२.२) ठीक. 'चक्षुर्वै सत्यं' किंवा 'आँखों देखा हाल' वाला मामला असल्यास या मुद्द्यावर तरी वाद मिटला.
(२.३) माझी भूमिका वेगळी आहे. ... माझी मीमांसा अशी -
प्रचाराचा भाग गृहित धरला तरीही वाजपेयींच्या सरकारने इंडिया शायनिंग असा दावा करण्यात फार चुकले होते असे बिलकुल नाही. काही ठराविक क्षेत्रांची वेगाने होणारी प्रगती पाहून जे तुलनेने मागे पडलेल्या (येथे आपल्याप्रमाणेच मलाही ज्यांना शायनिंग दिसले नाही त्यांना अशिक्षित घोषित करायचे नाहीच.) त्यांच्याही अपेक्षा वाढल्या आणि त्याची किंमत मोजावी लागली. अर्थात हे भाजपापुरते मर्यादित न राहता यापुढील काळात सर्वच पक्षांना या वाढत्या अपेक्षांना सामोरे जावे लागणार आहे. केवळ निवडणुकांमध्ये यश मिळाले नाही म्हणजे ज्या सुशिक्षितांना शायनिंग दिसले ती निव्वळ धूळफेक ठरत नाही. (अवांतर - शायनिंगच्या जोडीला आणखी काही असते तर कदाचित सारे श्रेय शायनिंगलाच मिळाले असते की काय असे एक मनात डोकावून जाते.)
काही ठराविक क्षेत्रांमध्ये भरमसाट वेगाने प्रगती झाली हे खरेच; ते चांगलेही आहे. पण तो फार तर विकासाचा पहिला टप्पा म्हणता येईल. एकीकडे काही क्षेत्रांत प्रगती होऊन काही लोकांच्या हातात अचानक भरपूर पैसा खेळू लागतो (जे चांगले आहे), पण दुसरीकडे या थोड्या लोकांच्या हातात भरपूर पैसा खेळू लागल्याने अचानक भाजीपाल्यापासून सगळ्याच्या किमती वाढू लागतात (पण या क्षेत्रांबाहेरच्या लोकांचे उत्पन्न मात्र बदलत नाही) आणि तिसरीकडे दुष्काळामुळे आणि कर्जांखाली बुडून शेतकरी घाऊक भावात आत्महत्या करतात, हे 'शायनिंग'चे चित्र मुळीच नाही. (हे फक्त आर्थिक परिस्थितीबद्दल झाले. सामाजिक आणि आंतरधर्मीय परिस्थितीबद्दल तर बोलायलाच नको!) जोपर्यंत प्रगती सर्वांगीण नाही, तोपर्यंत त्या 'शायनिंग'च्या दाव्याला काहीही अर्थ नाही. फक्त काही मर्यादित क्षेत्रांत झालेल्या प्रगतीच्या आधारावर, इतर सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून (किंवा त्या सोयिस्करपणे झाकून) 'शायनिंग'चा डांगोरा पिटणे म्हणजे धूळफेक किंवा पब्लिसिटी स्टंट नव्हते तर आणखी काय होते?
आणि या ठराविक क्षेत्रांत काम करणाऱ्यांव्यतिरिक्त इतरांच्या अपेक्षा वाढल्या तर त्यात काय चुकले? किंबहुना "एकास एक मत" का असावे याचे हे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येकाला आपापले हितसंबंध सांभाळण्याची अक्कल असते. एखाद्या अचाट दाव्यास भुलणाऱ्या प्रत्येकामागे न भुलणारेही अनेक असू शकतात. उलट काही ठराविक लोकांच्या हाती मताधिकार गेले, की मग तर राजकारण्यांचे काम आणखी सोपे - केवळ या छोट्या गटास भुलवले की काम फत्ते!
आणि "अर्थात हे भाजपापुरते मर्यादित न राहता यापुढील काळात सर्वच पक्षांना या वाढत्या अपेक्षांना सामोरे जावे लागणार आहे." हे खरेच आहे. ते तसेच झाले पाहिजे. त्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही.
(किंबहुना या चर्चेचा मूळ उद्देश काहीसा असाच [म्हणजे सर्व प्रकारच्या राजकारण्यांना आपल्या अपेक्षांची ठामपणे जाणीव करून देणे] आहे, असे वाटते.)
बाकी "(अवांतर - शायनिंगच्या जोडीला आणखी काही असते तर कदाचित सारे श्रेय शायनिंगलाच मिळाले असते की काय असे एक मनात डोकावून जाते.)" हे कळले नाही.
(४.१) राममंदिराच्या विषयावरून द्वेष भडकाविणे, (कोणीही) दंगली पेटविणे हे नक्कीच विघातक आहे. पण राममंदिराच्या आग्रहाची कोणाची भूमिका असणे आणि कोणत्या (उदा. भाजपा) पक्षाने तशी भूमिका मांडणे यात कोणतीही चूक नाही. देशासमोरील कोणत्या प्रश्नांना प्राधान्य द्यायचे या तारतम्यावर/अक्कलेवर त्या त्या राजकीय पक्षांचे आणि त्याहूनही त्या त्या समाजाचे देशाचेही भले होईल.
अधोरेखित वाक्य अत्यंत महत्त्वाचे आहे. (आणि कदाचित हेच आपल्या राजकारण्यांना कसे ठसवायचे, हा [माझ्या कल्पनेप्रमाणे] या चर्चेचा [मूळ] विषय आहे.)
आग्रह कोणीही कशाचाही धरावा, त्याला आक्षेप नाही. त्याचा 'इलेक्शन प्लँक' बनू लागला, की प्रश्न सुरू होतो. (पुन्हा राजकारण्यांच्या भूलथापांना फसण्याचा मुद्दा!)
आणि 'स्फुल्लिंग चेतवण्या'चेच बोलायचे झाले, तर पंधराशे कितीतरी साली (तपशिलाची चूभूद्याघ्या) बाबराने एक राममंदिर पाडून तिथे एक मशीद बांधली, या गोष्टीने एक माणूस म्हणून तर जाऊच द्या, एक हिंदू म्हणूनही निदान माझे तरी स्फुल्लिंगबिल्लिंग काही विझले नव्हते, अजूनही विझलेले नाही. I have too many other things to be worried about, and yet many other things to be happy about (or proud of). (मुळात तिथे राममंदिर होते की नाही, या वादात मला पडायचे नाही. होते असे मानून चालू.) बहुतेक सामान्य माणसांची बहुधा हीच परिस्थिती असावी. अयोध्येतील काही स्थानिक हिंदूंची तेथे पूजाअर्चा करण्यास बंदी नसावी अशी इच्छा होती, आणि प्रकरण अनेक वर्षे कोर्टात पडून होते वगैरे सर्व मान्य, तिथे निर्विघ्नपणे पूजाअर्चा करता यावी ही मागणीही रास्तच, पण पत्र्या मारुती, ॐकारेश्वर किंवा माती गणपतीच्या (किंवा इतरही अनेक) देवळांपासून कमाल दहा मिनिटांच्या अंतरावर राहूनही तिथे न फिरकणाऱ्या किंवा क्वचित फिरकणाऱ्या विसाव्या शतकातल्या सामान्य पुणेकरास त्याचे सोयरसुतक असण्याचे काही कारण नव्हते. तो आपले रोजचे व्यवहार सुरळीतपणे (की सुरळितपणे?) आणि ताठ मानेने पार पाडत होता - त्याची कोठेही अडवणूक होत नव्हती. अशा परिस्थितीत या एसेन्शियली (मराठी प्रतिशब्द?) स्थानिक प्रश्नाचे राष्ट्रीयीकरण करून, मुळात न विझलेले स्फुल्लिंग (विझले आहे असे भासवून आणि नंतर) चेतवून नेमके काय साधले?
की हा सगळा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला राजकीय स्टंट होता? (म्हणजे परत राजकारण्यांच्या भूलथापा, आणि त्यांना कोणीही भुलू शकतो, हाच मुद्दा! आणि म्हणूनच एकास एक मत हवे.
आणि राजकारणी कोणत्याही पक्षाचा असो - भूलथापांच्या पद्धती वेगळ्या, इतकाच फरक पडतो!)
(बाय द वे, हे 'स्फुल्लिंग' नेमके काय असते? या शब्दाचा नेमका अर्थ काय? इतकी वर्षे अंदाजानेच वापरत आलो आहे - नक्की अर्थ सापडू शकला नाही. काहीतरी ज्वालाग्राही पदार्थ आहे, एवढे निश्चित!)
(४.२) इंडिया शायनिंगच्या बाबतीत फसवे म्हणण्यापेक्षा फसलेले असे मी म्हणेन.
याबाबत मला काय म्हणायचे आहे ते वर (२.३) मध्ये मांडले आहेच.
नाण्याच्या दुसऱ्या बाजूला राजीव गांधींनीसुद्धा संगणकीकरण वगैरे आणून त्या क्षेत्रात देशाची प्रगती सुरू केली (आणि आमच्यासारख्यांची वाट मोकळी करून दिली) हे चांगलेच झाले, पण देश 'इक्कीसवी सदी'मध्ये वगैरे काही गेला नाही. कदाचित तेवढ्या क्षेत्रात थोडा पुढे गेला, इतकेच. त्यामुळे तीही घोषणा थोडीशी overratedच होती, असे मी म्हणेन.
प्रगती झाली नाही, असे म्हणायचे नाही, प्रगतीच्या दिशेबद्दलही वाद नाही, आणि सर्वांगीण प्रगतीला पुष्कळ वेळ लागेल, हेही कळते; फक्त दाव्यांच्या, घोषणांच्या अतिरेकामुळे ते फसवे होतात, एवढेच!
('मेरा भारत महान' ऐवजी 'मेरा भारत महान बनायेंगे' अधिक प्रामाणिक ठरले असते.)
(४.३) आणि अणुक्षमतेच्याच बाबतीत बोलायचे झाले... पण हा केवळ एक उन्मादच होता आणि म्हणून फसवणूक असे बऱ्याचदा ऐकू येते (आपल्याकडून नाही हो!!) म्हणून त्याचीही री ओढली.
यात फसवणूक होती, असे म्हणू शकणार नाही. फक्त नंतरचा उन्माद / euphoria विनाआधार होता, एवढेच म्हणेन.
बाकी या मुद्द्यावर आपले एकमत असल्याने अधिक बोलण्यात अर्थ नाही.
(५) ...कदाचित भविष्यात अशा किंवा तत्सम प्रकारे अतिसुशिक्षितांना फसविणारा पक्ष उगवेल म्हणून उगाचच एक कल्पनाविस्तार!!
त्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाची/राजकारण्यांची काय गरज आहे? अशा प्रकारे 'सुशिक्षित' तसेही फसू शकतात! 'डॉटकॉम बबल' काही राजकारण्यांनी सुरू केला नव्हता! हर्षद मेहताही काही राजकारणी नव्हता! (पण हे विषयांतर झाले.)
असो. ही उपचर्चा माझ्या बाजूने मीही इथेच संपवत आहे. टोलवाटोलवी चालूच राहील, पण इथे विषयांतर होऊ शकेल. तेव्हा पुन्हा कधीतरी.
- टग्या.