अन्यायाच्या विरुद्ध अतिरेकी कधी निर्माण होतील ?
थोडेसे विस्ताराने लिहीतो. कोणत्याही समाजात कोणत्याही बाबतीत लोकांचे विभाजन हे घंटेच्या आकाराच्या आलेखासारखे झालेले असते. उदा. गणेशोत्सवाची वर्गणी / खंडणी मागीतलीच / दिलीच पाहिजे असे म्हणणारे आणि ती सक्तीने अजिबात गोळा करता कामा नये असे म्हणणारे यांची संख्या टक्केवारी अगदी कमी असेल, तर बहुतांश लोक 'जाऊ दे ना, कशाला त्रास करून घ्यायचा, देऊन टाकू पाचपन्नास रूपये, कुठे गुंडांच्या नादाला लागता...' अशा (भेकड) मनोवृत्तीचे असतात. या बहुसंख्य लोकांची निष्क्रीयता समाजातल्या अनिष्ट प्रवृत्तींना खतपाणी घालते. आपल्याला होणारा त्रास आपण विरोध न करता सहनच केला पाहिजे या बुळबुळीत वृत्तीमुळे अशा गुंडांचे फावते.
आता विरोध करायचा म्हणजे गुंडगिरीचे उत्तर दुप्पट गुंडगिरीने द्यायचे असा उदात्त विचार सर्वच लोक करू शकत नाहीत.त्यामुळे गणपतीच्या मंडळात स्फोट घडवून आणणे किंवा तंबू जाळून टाकणे हे क्रांतिकारी उपाय कितीही परिणामकारक असले तरी ते सगळ्यांना कसे पटणार? ज्या दिवशी आपल्याला न पटणारी गोष्ट घडत असेल तर ती उध्वस्त करून टाकायची हाच यशाचा एकमेव मार्ग आहे, हे या देशातल्या लोकांना कळेल, तो सुवर्णदिन!
अवांतरः चं. प्र. देशपांडे यांचे 'ढोल ताशे' हे नाटक पहावे अशी माझी सर्व मनोगतींना विनंती आहे. गणेशोत्सवात ते हमखास कुठल्या तरी वाहिनीवर दाखवले जाते.