तात्या, घरच्या लोण्याची सर कशालाच नाही. आम्ही पण भारतात असताना जाड सायीचे दही बनवून ताक करायचो व नंतर ताकातून आलेले भरगच्च लोण्याचे कणीदार तूप बनवायचो. पण इथे अमेरिकेत सगळी दुधे फुकळवणी. एकाही दुधाला साय धरत नाही. प्रतिसादाबद्दल आभार.

सुभाषराव, प्रतिसाद व अधिक टीपेबद्दल आभार.

वर सांगितल्याप्रमाणे पिवळे होऊन लोण्याचे पूर्ण तुपात परिवर्तन झाले की लगेच ते भांडे/पातेले पाणी भरलेल्या दुसऱ्या परातीत किंवा पसरट भांड्यात पाणी घेऊन तुपाच्या भांड्याचे बूड त्वरित गार करावे.  नाही तर आचेवरील ऊष्णतेने झालेले तूप जळून/करपून काळे होते.

ही टीप अतिशय महत्त्वाची. किंचीत लालसर होण्याची पण वाट पहाता कामा नये. पिवळा रंग आला की लगेच गॅस बंद करून आपण सांगितल्याप्रमाणे केले पाहिजे. 

रोहिणी