(वेळ: रात्री साधारण उशिराची. सगळे नुकतेच झोपलेत. फोन वाजतो.)
हॅलो.... प्रकाश आहे का?
नाही. इथे कोणी प्रकाश राहत नाही. (फोन ठेवून दिला.)
(अर्ध्या तासानंतर परत...)
हॅलो.... प्रकाश आहे का?
(किंचित वैतागून...) नाही! इथे कोणीही प्रकाश राहत नाही!!! (फोन ठेवून दिला.)
(अर्ध्या तासानंतर परत...)
हॅलो.... प्रकाश आहे का?
(भयंकर वैतागून...) अहो, किती वेळा सांगायचं तुम्हाला? नाही! इथे कोणीही प्रकाश राहत नाही!!! परत फोन करू नका!!! (फोन ठेवून दिला.)
(अर्ध्या तासानंतर परत फोन वाजतो. मालक भडकूनच उठतात आणि फोन उचलतात. पलीकडून शांतपणे:)
हॅलो, मी प्रकाश. माझ्यासाठी काही फोन, निरोप वगैरे आले होते का?