दोन म्हशी, दोन मांजरं वा दोन कुत्रे रस्त्याने जाताना कधीही एकामेकाकडे बघून न हसणे, मागे वळून बघताना मान दुखणे, शेजारच्या गल्लीतले काळ्या रंगाचे कुत्रे, ऑलिंपिक्सची तयारी, मोतीचुराच्या गोळ्या आणि या सर्वातून मिळालेला धडा...
सही! मस्त आहे लेख. (मोतीचुराच्या गोळ्या वगळता इतर गोष्टी टगोजीरावांच्या प्रतिसादातून घेतल्या आहेत.)
"साध्या प्रसंगांमध्येही आयुष्याचे सार गवसू शकते. बघण्याची दृष्टी मात्र हवी", "आयुष्य जरा सिरियसली घे", "आयुष्याच्या या वळणावर मागे वळून बघताना" असली वाक्ये वापरून वापरून गुळगुळीत झाली आहेत, इतकी गुळगुळीत की बोलणाऱ्याच्या लक्षात न येताही निसटून जातात :)