मनोगतवर कंपूबाजी आहे असे वाटत नाही आणि काही लोकानी कंपू निर्माण केला तर त्याचा दोष मनोगतकारांवर येत नाही,पण मला मांडणीविषयी जो एक अनुभव आला तो याठिकाणीच नमूद करावा वाटतो,तो असा की मुखपृष्ठावर कोणता लेख वा चर्चेचा उल्लेख यावा याविषयी काही नियमच नसल्यासारखे वाटते.उदा̱. ८ वा १२ गोळ्यांचे कोडे किंवा जागतिक फूटबॉल स्पर्धा या आता काहीही संदर्भ नसलेले विषय अधूनमधून अजूनही मुखपृष्ठावर चमकतात.एकदा मुखपृष्ठावर आलेला विषय नवीन म्हणून उघडला तर तो दोन वर्षापूर्वीचा निघाला.याविषयी काही करणे शक्य झाले तर बरे होईल. नवीन लेख वा चर्चा याविषयी चार शब्द काही दिवस मुखपृष्ठावर दिसावेत अशी अपेक्षा आहे.