डेटा हा उच्चार तसा बरोबर वाटतो आणि आहेही. परंतु, कामानिमित्त मला नुकताच काही दक्षिण इंग्लंडमधील मंडळींना भेटण्याचा योग आला. त्या जवळपास सर्वांनी (६-७) ह्या शब्दाचा उच्चार डेटर (र चा उच्चार अर्धवट) असा केला.

भाषा आणि त्याचे उच्चार प्रवाही असतातच शिवाय ते स्थळाप्रमाणे बदलतातही. अगदी उच्चाराधारीत (फोनेटीक) समजल्या जाणाऱ्या जर्मन भाषेतही "मी" ह्या शब्दाचे "इश्" आणि "इख्" असे दोन्ही प्रमाण उच्चार आहेत !

तेव्हा आम्हा परभाषिकांनी कोणता उच्चार प्रमाण मानावा ?

जाता जाता - अरुणराव, तुमच्या यादीत अजून एक भर -

चूक                        बरोबर

कॅब्रे                        कॅबरे

 

(आंबटशौकीन) सुनील

 टीपः "उच्चाराधारीत" हा शब्द शुद्धलेखन चिकित्सकाला मंजूर नाही ! तेव्हा "फोनेटीक" ला दुसरा शब्द सुचवा !