स्वतः बुद्धाने भिक्षेत मिळालेले सामिष अन्न खाल्ले होते व ते भिक्षूंना वर्ज्य केले नव्ह्ते असे वाचनात आले.

माझ्या स्वतःच्या वाचनात आलेली माहीती ही तिख न्हात हान्ह (Thich Nhat Hanh) या प्रसिद्ध विएतनामी बौद्ध भिक्षूंनी लिहिलेल्या "Old Path white clouds" या बुद्धाच्या जीवना वरील पुस्तकातून आहे. त्यातील माहीतीप्रमाणे देवदत्त या शिष्याने संघातील भिक्षूंसाठी असलेले नियम बदलायचा प्रस्ताव मांडला त्यात "भिक्षूंनी फक्त शाकाहारी अन्न सेवन करावे" हा बदल पण सुचवला. तेव्हा बुद्धाने त्याला अनुमती दिली नाही व भिक्षेत मिळालेले सामिष अन्न भिक्षू खाऊ शकतात असे सांगितले. त्या साठी बुद्धाने घातलेल्य अटी म्हणजेः

१> ते अन्न फक्त त्या भिक्षूं साठीचशिजवले गेले नाही याची खात्री असेल तरच स्विकारावे
२>प्राणी मारताना भिक्षूंनी पाहिली वा ऐकले नसेल तरच स्विकारावे

माझ्या कडील पुस्तका प्रमाणे ही कथा जीवक सुत्रातील आहे.

ह्या विकीपीडीया च्या दुव्या वर या बाबत अधिक माहिती व विशिष्ट सुत्र/निकाया यातील संदर्भ सापडू शकतील. ते पहावे.

ह्या दुव्या वरील माहीती देखील वाचनीय आहे. या मतांशी मी बराचसा सहमत आहे

ह्यात लक्षात घ्यायची गोष्ट अशी की या सर्व गोष्टी मध्ये बुद्ध फक्त भिक्षूंच्या समस्ये बद्दल बोलत होते. आणि बुद्धाच्या हयातीत तरी भिक्षू फक्त भिक्षेवरच  (स्वतः अन्न न शिजवता) जगत होते. बुद्धानी सर्व सामान्य/ गृहस्थ बौद्धांना मांसाहार करण्यास वर्ज्य केले नसले (माझ्या माहीती प्रमाणे, चु.भू.द्या̱. घ्या) तरी त्या बाबतीत उत्तेजन तर कदापि दिले नाही आहे. माझ्या माहीतीतले सर्व महायान बौद्ध देखिल शाकाहारीच आहेत.