कारण, माझ्या माहिती प्रमाणे, बौद्ध धर्म शाकाहारी आहे

पण मग बौद्ध म्हणवणारे एकजात सर्व आग्नेय आशियाई / पूर्व आशियाई देश मांसाहारी आहेत, याचे आपण काय स्पष्टीकरण देऊ शकता?

(नाही म्हणायला अमेरिकेतल्या चिनी उपाहारगृहांच्या मेनूंमध्ये 'Buddha's Delight' नामक एक अत्यंत बेचव शाकाहारी विकल्प पाहिलेला आहे, पण ते तेवढेच. एरवी सगळा प्रामुख्याने सामिष कारभार!)

फार काय, अटलांटातल्या एका थाई भोजनालयाच्या दर्शनी भागात शेजारीशेजारी बुद्धदेव आणि गणपतिबाप्पांच्या मूर्ती (थायलंडमध्ये बुद्धदेवांबरोबरच गणपतिबाप्पांनाही मानतात ही आपली एक ऐकीव माहिती!) आणि दोघांनाही भक्तिभावे ठेवलेला कोळंबीचा नैवेद्य पाहिलेला आहे, त्याचे काय?

(तसेही आग्नेय आशियाई देशांत एकंदरीत 'सीफूड' हा प्रकार शाकाहारीच मानला जातो, ही अशीच आणखी एक unverified ऐकीव माहिती!)

- टग्या.