पण मग बौद्ध म्हणवणारे एकजात सर्व आग्नेय आशियाई / पूर्व आशियाई देश मांसाहारी आहेत, याचे आपण काय स्पष्टीकरण देऊ शकता?

आपला मुद्दा रास्त आहे. या संबंधात माझ्या आधीच्या प्रतिसादात दिलेला विकिपीडीया दुवा बघा. त्या खेरीज इतर काही मुद्दे म्हणजेः
१> समस्त अग्नेय आशिया बौद्ध नाही. चीन मध्य बरेच "चिनी सनातन धर्म" (कन्फूशियस, पितरांची पूजा वगैरे) पाळणारे सुद्ध बरेच लोक आहेत. कोरिया व जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर ख्रिस्ती धर्माचा बराच प्रचार झाला आहे.  मलेशिया, इंडोनेशिया बरेचसे इस्लामी आहेत.
२>बौद्धांमध्ये सुद्धा विविध संप्रदायां मध्ये (उदाः महायान, सोटो झेन, रिनझाई झेन, "pure land buddhism", तिबेट मधले बौद्ध, थेरवादी म्हणजेच हीनयान वगैरे) मांसाहारा विषयी मतभेद आहेत (विकिपीडीया व दुसरा एक दुवा आधीच्या प्रतिसादात आहे तो पहा).

यात विशेष गोष्ट अशी की यातील बहुतांशी संप्रदायातील "भिक्षू" शाकाहार पाळतात.