श्री प्रभाकर,
आमरस पुरीची पाक कृती सुंदरच दिली आहे.
आमरस काढल्यावर सर्व कोयी थोडे दूध घालून एका पातेल्यात थोडावेळ भिजत ठेवणे. त्याच दुधात उरलेल्या कोयींबरोबर असलेला रस काढून ते दूध आमरसात घालणे. तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे आमरसामध्ये साजुक तूप व थोडी मिरपूड घालणे. मिरपूड घातल्याने आमरस बाधत नाही. नुसत्या हापुसचा तर आमरस खूपच सुंदर लागतो, हापुस+ पायरीचा पण छान लागतो.
यामध्ये पुऱ्यांची पण पाककृती दिलेली आहे. त्याप्रमाणे पुऱ्या करून पाहीन. रवा घातल्यामुळे पुऱ्या कडक होतात का? बरेच दिवस झाले मी कडक पुऱ्यांच्या पाक कृतीच्या शोधात होते. ती आता मिळाली. मला पुऱ्या एवढ्या चांगल्या जमत नाहीत, कच्च्या राहतात. त्यासाठी काय करावे? पुऱ्या पातळ/जाड लाटणे? तळताना आच कशी ठेवावी? मध्यम की तीव्र?
एकदा आईने आमरसाबरोबर पुऱ्या केल्या होत्या आणि त्या साजुक तुपामध्ये तळल्या होत्या. साजुक तुपामधील तळलेल्या पुऱ्या अतिशय स्वादिष्ट लागतात.
रोहिणी