टगोजी,
अटलॅऽणा/अटलॅऽणं...
अशा प्रकारचे उच्चारलेखन आवडले. आणि आपल्या (नुसती देवनागरी नव्हे तर मराठी, कारण आपण विविध बोलींतले उच्चार मराठीत खूप नीट व सराईतपणे लिहितो असे मला वाटते) लिपीचे उच्चार अचूकपणे दर्शविण्याचे सामर्थ्य पुन्हा जाणवले.
या निमित्ताने आम्हा सर्वसामान्य मराठमोळ्या लोकांच्या माहितीसाठी अमेरिकेतील काही गावांच्या नावांचे अचूक उच्चार द्याल का? वेगळा लेख लिहिल्यास त्याचे मी आणखी उत्साहाने स्वागत करेन.
दिगम्भा