कुरूंदकर सरांबद्दल आपण काढलेल्या शब्दांनी ज्यांना वाईट वाटले त्यांनी सरांबद्दल माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि ज्यातून तुम्हाला त्यांची पूर्ण माहिती कळली असो नसो कल्पना जरूरच आली असेल. तुमच्या बदललेल्या मतांचा परिणाम तुमच्या लेखनात कुरूंदकर सरांच्या उल्लेखात झालेल्या फरकातून दिसत आहेच.

तुमच्या गुरूमहाराजांबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न जवळपास सर्वांनीच केला. माहिती द्यायला तुम्हीच नकार देत आहात. मिळालेल्या माहितीतून जर असे खरंच सामोरे आले की तुम्ही म्हणत असलेले गुरूमहाराज हे खरंच कोणीतरी महान विभुती आहेत तर ते मान्य करायला कोण कशाला नकार देईल? प्रश्न आहे तो विश्वासाचा ! तुम्हाला जर गुरूमहाराजांबद्दल विश्वास असेल तर सांगा की खुलासेवार सर्व काही ( त्यांच्या नावपत्त्यासहित सर्व काही )बिनधास्त त्यांच्याबद्दल. खरोखरच वंदनीय कार्य केलेले असल्यास तुमच्या गुरूमहाराजांबद्दल जाणून घेण्यास सर्वचजण उत्सुक असतील हे वेगळ्याने सांगणे न लगे. निरर्थक खेळ्या खेळणे बंद करून सकारात्मक माहिती देता आली तर बघा.