विडंबन म्हणून ठीक आहे पण मतला
करायचा म्हणून केला आहे.
चोखंदळभाऊ, मतलाच काय, अख्ख विडंबनच करायच म्हणून केलं आहे.
काही शेर बरे आहेत पण खाकरण्यात खास काही नाही.
भाऊ, तुझं कधी नाक चोंदलं आणि कंठ (पक्षी घसा) दाटला की मग तुला कळेल खाकरण्यात खास काय असतं ते!
डरडरताना चूक.
चूक व्याकरणाची की कृतीची म्हणतोयस? काय आहे, कृती संकोचजनक असली तरी कधी कधी आपल्या हाताबाहेरची असते. नाईलाज असतो हो. बाकी, विनोद बाजूला ठेवला तर इथे कुंथणे आणि डरडरणे लिखाणाच्या प्रेरणेबद्दल म्हटले आहे हे तुझ्यातल्या चोखंदळ टिकाकाराच्या कसे काय लक्षात आले नाही?
पंचा सुटला अश्लील.
बालसाहित्य वाच बाबा तू. चुकून प्रौढांच्या विभागात आलेला दिसतोयस.