खरं तर सावरकरांशी आमचं जुनं नातं. त्यांना अंदमानला आणलं तेव्हा बरोबरच्या शिपायांनी त्यांना साखळदंडांनी जखडून ठेवलं होतं. आम्हांला बघितल्यावर किंवा नुसतं नाव ऐकल्यावर कैदी कापायचे, पण या गृहस्थानं मात्र आमच्याशी दोस्तीच काय पण वादविवादसुद्धा केले. मी त्या माणसाला मानतो, फक्त तसं दाखवत नाही. शेवटी अपयशी का असेना पण आर्यलंडच्या स्वातंत्र्यासाठी लढलेला मीही एक क्रांतिकारकच ना! त्यांच्याबद्दल जे जे करता येईल ते ते करू या. माझ्या परीनं मीही सहभागी होईन.
कळावे.
आपला,
मी_इ बारी
(जेलर ,सेल्युलर जेल, अंदमान.)