वा! अनुताई! आपण एक सिद्धहस्त लेखिका आहात असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही! अप्रतिम लेख!!

आपल्या लिखाणातून नेहमीच जाणवते ती (ता० क० - थालिपीठासारखी!) खुसखुशीत खमंग विनोदी शैली आणि ह्या लेखातील विशेष गोष्ट म्हणजे प्रस्तुत विषयाचा अभ्यास. अभ्यास म्हणणे जरा अति होत असेल तर आपण त्याला 'स्मरणशील निरीक्षण' म्हणूयात. 'स्मरणशील' वरून आठवले, तुम्हाला तुमची आई लहानपणी 'मेंदूला तरतरी देते आणि शक्ती वाढवते' ते रसायन देत होती का हो?

आपला
(चाहता) प्रवासी