अनु, घरोघरी घडणारे वर्णन छान केले आहेस.
आईकडे असताना जेंव्हा आवरा आवरी व्हायची त्यामध्ये दोन गट पडायचे. आई विरुद्ध आम्ही तिघे (आम्ही दोघी बहिणी व बाबा) . आवरा आवरीमध्ये फेकाफेकी करण्यात आम्ही तिघे तरबेज. हे कशाला पाहिजे? दे फेकुन. ते कशाला पाहिजे? दे फेकून. मग आईचा आरडाओरडा. हे कशाला फेकतेस हे अमक्या वेळी उपयोगाला येईल, ते तमक्या वेळी उपयोगाला येईल. मग आम्ही तिघे एकमेकांना खुणवायचो की अमक्या अमक्या वस्तु बाहेर फेकायच्या आहेत. मग आई कामामध्ये तल्लीन झाली की तिच्या नकळत वस्तु गुपचुपपणे जाउन बाहेर फेकून यायचो.