अनु, सही लिहिले आहेस.
'दातोंके कानेकोपरेतक' आणि 'कुर्‍हाड सुगंधद्रव्य' वाचून गालातले हसू अंमळ जास्तच रुंदावले! आणि त्याच क्षणाला इथल्या व्यवस्थापक महाराजांना मला प्रश्न विचारायला यावेसे वाटले. त्यांच्या चेहर्‍याकडे बघू ही मुलगी थोडी 'ही'च आहे असे त्याचे मत पक्के झाल्याचे कळले.

बाकी प्रवासींच्या मताशी मी सहमत. इतके सगळे तपशील तुझ्या लक्षात राहतात, खरोखर कमाल आहे.