२२ जुलै २००६ च्या लोकसत्ता दैनिकाच्या मलपृष्ठावरील केरोसिनसंबंधातील अर्धे पानभर असलेली जाहिरात पाहा.

मराठी भाषेची कशी कत्तल केली जाऊ शकते याचे एक छान उदाहरण आहे.

आम्ही ही गोष्ट संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. ज्यांनी ही जाहिरात दिली ते अमराठी भाषिक आहेत. त्यांना मराठीची जाण असणे अभिप्रेत नाही. पण लोकसत्ता दैनिकाच्या संपादकांची आणि संबंधित कर्मचाऱ्यांची ही जबाबदारी नाही का?

मराठी भाषेची जाण असलेल्या पदवीधरांची नेमणूक करून 'प्रुफ रिडींग' नामक कार्यभाग सांभाळू शकेल असा कर्मचारीवर्ग वर्तमानपत्र व्यावसायिकांनी तयार करावा असे वाटते. आपल्या काही सूचना? जनमताचा रेटा तयार केला तर काही होऊ शकेल का?