फोटोतून एक व्यक्ती गायब होणे हा चमत्कार तर आता माहितीच आहे आपल्या सर्वांना.. आज एक आगळाच चमत्कार प्रत्यक्ष मला स्वतःला अनुभवायला मिळाला आहे. २९ तारखेला आम्ही लोणावळ्याला गेलो होतो तेव्हा वेगवेगळ्या कॅमेरांमधून आम्ही फोटो काढले होते जे इ-पत्रातून आमच्या चमूतल्या एकाने आम्हा सर्वांना पाठवले. इ-पत्र उघडून बघतो तर काय?! फोटोतले सगळेचजणं गायब मागच्या सिनरीसकट !!!! इ-पत्रात पूर्ण पांढऱ्या चौकटी आणि त्यात प्रत्येक फोटोगणिक फक्त वरती डावीकडच्या कोपऱ्यात एक लाल फुली दिसत होती ! हा कोणत्या गुरुमहाराजांचा ( की गुरूमहाराणींचा?! ) चमत्कार आहे हाच काय तो शोध लावायचा बाकी आहे ! धोक्याची घंटा तर नाही ना ही?! जलतु जलालतु आई बला को टाल तू ... ;-)