मुल्लामौलवींची भीती न बाळगता "भारत माता की जय" असा जयघोष मनापासून करणारा एक मुसलमान आपल्याला माहिती आहे काय ?

परमवीरचक्र हे भारताचे सर्वोच्च मान असलेले पदक एका मुस्लिम सैनिकाला अब्दुल हमीद ला मिळालेले होते विसरलात काय?  (जरी हा भूतकाळ असला तरी तशी स्थिती होती)

असो.

मिलींदराव,

मला प्रतीसादांची भुक नाही. आणि इथे जे लिहिले त्यात माझे स्वतःचे असे काहीच नाही. फ़क्त एक मनात असलेली 'सल'!

मनोगतावर हे देण्याचे कारण एवढेच की  ही बातमी सगळ्यांना कळावी (कदाचित अनेकांनी ती आधीच वाचलीही असेल ) . इथे येणाऱ्यात (जे नेहमी फ़क्त लिहितात तेच नव्हे तर बरेचसे वाचक म्हणुनही येतात) नक्कीच असे कोणीतरी असतील की जे काहीतरी करू शकतील ... असा माझा समज आहे / होता.

काही लोकांच्या लेखनीत येवढे सामर्थ्य आहे की जर त्यांनी वेगळी वाट चोखळली तर नक्कीच काही तरी चांगले होऊ शकेल ...

 बाकी, शास्त्रीय संगीत चर्चा आणि इतर लेखांना प्रतिसाद, हे वेगळे विषय आहेत. ते लेख त्यांच्या त्यांच्या जागी छानच होते... त्याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही

असो,

--सचिन