लेकीची लेकरं उडती पाखरं, लेकाची लेकरं चिकट भोकरं.
आधी करी सून सून, मग करी फुणफुण
सुईण आहे तो बाळंत होऊन घ्यावे.
जांवई माझा भला आणि लेक बाईलबुद्ध्या झाला.
बाईलवेडा लेक पिसा, जांवई मिळाला तोही तसा.
माझा ह्यां असा, बायकोचा तां तसा, गणपतीचा होऊचा कसा?
(हे म्हणजे सही कोकणी)
या विशेष आवडल्या. तशा सगळ्याच मस्त आहेत. शाब्दीक हाणामारी करायला वापरल्या पाहिजेत. बघू कोण मिळतय का?