मला वाटते तुमचा प्रयत्न स्तुत्य असला तरी नुसता उत्साही चमू पुरेसा नाही. त्यासाठी अतिशय खुल्या मनाने विचार करणारी शहाणी माणसे हवीत.
सावरकर-साहित्याचे म्हणाल तर माझ्याकडे संपूर्ण सावरकर (एकूण १२ खंड) साहित्य आहे. त्यामुळे जमवाजमवीचा प्रश्नच नाही. परंतु सावरकरकरप्रेमी असूनही मला असे वाटते की त्यातील काही साहित्य सुमार आहे तर काही कालबाह्य झाले आहे. अशी चिकित्सा करणारे स्वयंसेवक असतील तर पुढचा प्रश्न. केवळ आंधळे पुरस्कर्ते असतील तर त्यांना सावरकर कळलेच नाहीत असे म्हणावे लागेल.
दुर्दैवाने आज काही संघटनांनी अतिशय जाणीवपूर्वक सावरकरांची 'हिंदुत्ववादी' ही इमेज जोपासली आहे. ('गाय ही माता आहे पण बैलाची' असे म्हणणाऱ्या सावरकरांचे नाव 'गोहत्या बंदी' चा आग्रह धरणाऱ्या संघटनांनी घेणे हे अतिशय हास्यास्पद आहे) त्यामुळे आज बहुतेक (तथाकथित) सावरकरप्रेमी हे बहुधा त्या इमेजला जपू पाहतात. आपला चमू अशा व्यक्तींनी तयार होणार असेल तर मला अशा चमूचा भाग होणे मुळीच आवडणार नाही. त्यासाठी चमूचे सदस्य होऊ इच्छिणारे सर्वजण जर आपली सामाजिक/राजकीय भूमिका स्पष्ट करतील तर बरे. त्यानुसार निर्णय घेता येईल.
आपल्या लिखाणाबद्दल तात्यांच्या मूल्यमापनाशी सहमत.
-विचक्षण