ज्या प्रमाणात ( मेगावॅट) औष्णीकऊर्जा प्रकल्प ( थर्मल पावर प्लांट) आणि जलविध्युत प्रकल्प ( हाय्ड्रोपावर प्लांट )  उर्जा निर्माण करतात त्या प्रमाणात सौरऊर्जेचे प्रकल्प  उर्जा निर्माण करु  शकत नाहीत.

सौरऊर्जेची लाभाची टक्केवारी (प्रॉफिट मार्जिन) फारच कमी आहे हो.

वरील मुद्दे मान्य आहेत. मी एक सामान्य नागरिक आहे. तांत्रिकद्रुष्ट्या ते कितपत शक्य आहे ते तज्ञच सांगू शकतील. पण मला वाटते लहान भागांसाठी सौरऊर्जेचे प्रकल्प लाभदायक ठरू शकतील. आज लाभाची टक्केवारी कमी असेलही. सुरवातीला सर्वच नविन शोध/पर्यायांची लाभटक्केवारी कमी असते. पण जोपर्यंत एखादी वस्तू व्यवस्थितपणे वापरात येत नहित तो पर्यंत त्यामध्ये अजून काय सुधारणा करावी लागेल जेणेकरून ती टिकाऊ व लाभदायक असेल हे कळत नाही.

पुण्यामध्ये काहि वाहतूक नियंत्रण दिव्यांवर सौरउर्जेचे पॅनल (पत्रे) बसवलेले आहेत. त्यासाठी वेगळी वीज वापरली जात नाहि.