सचिन,
अनास्था तर आहेच, त्याशिवाय आपल्या देशाची आहे ती स्थिती झाली नसती.
आणि तुम्हाला आणि कोणालाही कितीही वाटले, तरी असे विषय बऱ्याचजणांना नको असतात - मग कारणे काहीही असोत - मी स्वतः असंच वैतागून लिहून मग त्यातून "शहाणी" होऊन तुम्हाला सल्ला देते आहे. शेवटी काय - की आपल्याला जेथे सुधारणा करावीशी वाटते तिथे आपण स्वतः जमेल तशी ती करतो का हे बघावं. तुम्ही लोकांपर्यंत ही बातमी पोचवलीत, ते नक्कीच चांगले केलंत. तुमच्या लेखाची २४४ वाचने झाली आहेत (आतापर्यंत) ह्यात समाधान माना. ही पहिली पायरी समजा. त्यापुढे जाऊन प्रत्येकजण त्या बातमीतून काही बोध घेणार का "ये अपने बस की बात नहीं" म्हणून सोडून देणार ते ज्याच्या त्याच्या तयारीवर आहे असं समजा.
सुहासिनी