मृदुलाशी सहमत!
तसेच भोमेकाकांच्या या मताशीही -माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्याने कंपू बनणे साहजिकच आहे. त्यात काही फार मोठे पाप आहे, किंवा ते गैर आहे असे वाटत नाही. आणि मला फरकही पडत नाही.

पूर्वी मनोगतावरील मर्यादित सदस्यसंख्या असताना जवळजवळ सगळ्याच मनोगतींशी ओळख झाली होती. पुढे सदस्यसंख्या गतीने वाढली. सगळे मनोगत वाचून होईनासे झाले. त्यामुळे कधी जुन्या/ओळखीतील मनोगतींशी बोलणे झाले तर नवीन काही लिहिलेत का ? विचारल्यास त्यांच्या लिखाणाचा दुवा मिळून ते वाचणे सोपे जायचे/जाते, आणि मग तेवढे वाचन होऊन त्याला प्रतिसाद दिला जातो, किमान माझे तरी असे होते. ह्याला कंपूबाजी म्हणावी असे मला वाटत नाही.

श्रावणी