माझे लहानपण कोंकणातल्या एका गावात गेले. तिथल्या मंगळागौरिचा सण म्हणजे धमाल असायची रात्रीचे जागरण . फुगड्या, उखाणे,सासू-सुनेचा खेळ, मग कधी कधी एखादा सिनेमा, पोहे कोंकण-स्पेशल गोड कॉफी किव्हा मसाले दूध मग आम्हा लहान मुलीचे खेळ आणि कुमारिकांचे उखणे मजा यायची. आणि हे वर्ष म्हणजे माझं लग्नानंतरचा पहिला श्रावण,पहिली मंगळागौर पण परदेशात असल्याने काहीच करता येणार नाही त्यामुळे फार वाईट वाटतंय. तरीही देवांची साधी पुजा करून मंगळागौरिची आरती करून जवळच्या देवळात जाण्याचा बेत केला आहे.
प्रथा कशी सुरू झाली, मंगळवारच का? ते माहीत नाही कदाचित अधिक माहिती संपूर्ण चातुर्मास या पुस्तकात मिळेल. मला विचाराल तर पूर्वीच्या गृहिणी आणि लवकर लग्न झालेल्या मुलींना करमणूक म्हणून हा सण कदाचित साजरा करत असतील.
-कांचन.