सचिन, ही काही पहिली घटना नाही. उत्तरेकडचा भाग वादग्रस्त म्हणून एकवेळ सोडून देउ. कर्नाटकात (बहुतेक हुबळीमधे) ध्वजारोहणाला आणि ध्वजवंदनाला बंदी घातली होती. आम्हाला आमच्या आईला वंदन करायची पण परवानगी नाही. आपल्या संसदेवर हल्ला होतो तरी आपण गप्प बसतो. आम्ही विष्णुदास इतके मेणाहुन मऊ आहोत की अतिरेक्यांच्या भावना दुखावू नयेत म्हणून आम्हीच आमच्यावर बंदी घालून घेतो. 'कठीण वज्रास भेदू ऐसे' ही ओळ आम्हाला कधी शिकवलीच नाही. जाऊ दे, मन आता इतकं निगरगट्ट झालं आहे की या घटनांची बोच आता लागत नाही. आमची चिडचिड फक्त internet link slow झाली किंवा मोबाईलवर कॉल ड्रॉप झालेकीच जाग्रुत होते.
प्रतिसादाच म्हणाल तर इथे 'मनोगता' वर याची धड चर्चा होईल असं सुध्दा वाटत नाही, मग प्रतिसाद देऊन फायदा काय? एखादा 'रेडा' किंवा 'पडीक' असा शब्द पकडतील आणि तिरक्या चर्चा सुरू करतील. त्यांच्या प्रतिसादांची संख्या मर्यादेच्या पलिकडे जाईल आणि ज्यांना खरोखर काही मत व्यक्त करायचे असेल त्यांना करता येणार नाही. (पहाः अध्यात्म आणि अद्भूत अनुभवांचे जग चर्चा )