इतके मेणाहून मऊ आहोत की अतिरेक्यांच्या भावना दुखावू नयेत म्हणून आम्हीच आमच्यावर बंदी घालून घेतो.
खरे आहे. यावरून एक आख्यायिक आठवली.
जेव्हा पारशी लोक पर्शिया सोडून जलमार्गाने भारतात आले, (८वे शतक) तेव्हाची गोष्ट. त्यांची गलबते गुजरातच्या किनाऱ्याला लागली. स्थानिक भारतीय राजाला (जडी/जादव राणा) शरण येऊन त्यांनी त्यांचे मंदिर (अग्यारी) बांधायची परवानगी मागितली. राजाने परवानगी, जागा आणि आर्थिक मदत दिली. हे अर्थातच भारतीय संस्कृतीला धरूनच होते आणि आहे असे वाटते.
पण इथून खरी आख्यायिका सुरू होते-
मग पारशांनी सांगितले की आमच्या मंदिरात फक्त आमच्या लोकांनाच प्रवेश असेल. तसेच आमच्या मंदिराच्या बांधकामावर तुमच्या लोकांची नजरसुद्धा पडता कामा नये. तेंव्हा राजाने दवंडी पिटवली की समुद्रमार्गे आलेले नवीन पाहुणे त्यांचे मंदिर अमक्या-अमक्या भागात बांधत आहेत. कोणीही त्या बाजूला फिरकू नये. फिरकल्यास कडक शिक्षा ठोठावली जाईल होऽऽऽ!
आता बोला!