श्री. दिवाण,
ही बंदी योग्यच आहे. मुलांच्या कमाईतून कुटुंबाचे पोट भरणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. याविषयाचे राजकारण होता कामा नये. समाजाची धारणा बदलली पाहिजे. मुलांना पोसायची जबाबदारी पालकांची आहे त्याउलट नव्हे. (पालकांचे पोषण मुलांनी करायचे नाही)
मुलांना शिष्यवृत्त्या देणे हा यावर योग्य उपाय नाही.
नुसतीच कायद्याने बंदी नाही तर मुलाना कामावर ठेवणाऱ्या व्यक्ति, संस्था, व्यवसाय यांना दंड आणि तुरुंगाची कडक शिक्षा देऊन अशा नियमांचे काटेकोर पालनसुद्धा केले पाहिजे.
"त्याचे कामच बंद झाल्यास साऱ्यांचे पोट कसे भरणार? हा विचार सरकारने केल्याचे दिसत नाही. त्यामुळे हा आदेश अन्यायकारक वाटतो. खेळ्ण्या-बागडण्याच्या वयात शिक्षण कुणाला नको वाटते? पण घरची परिस्थिती तशी असल्यास काय करणार? तुम्हाला काय वाटते?
गजानन दिवाण,
वरिष्ट उपसंपादक,
लोकमत, मुंबई."
आपण मत विचारले म्हणून स्पष्ट लिहिले आहे.
कलोअ,
सुभाष