गाठोडी घालणे - खाली बसून मांडी घालायची व पाउले दोन्ही हातात धरून तश्याच अवस्थेत एक गुडघा जमीवर टेकून एक वळसा देवून परत दुसरा गुडघा जमिनीवर टेकून परत दुसऱ्या बाजूने वळसा देणे.
होडी खेळणे - एकमेकींच्या पाउलावर बसून एकमेकीच्या गुडघ्याला हाताचा विळखा घालून त्याच अवस्थेत एकीने जमिनीवर पाठ टेकणे या अवस्थेत दुसरी वर तरंगेल. हाच क्रम परत दुसरी करेल. असे भरभर करणे. म्हणजे होडी जशी हलते ना त्याप्रमाणे दिसेल. फक्त एकमेकींना त्यांचे वजन पेलता आले पाहिजे.
सुपारी - एकमेकींचे हात वर धरून हात न सोडता गोल गोल व भरभर वळणे.
साखळी - यात २५-३० बायका ओळीने समोरासमोर एकमेकींचा हात वर धरून उभ्या राहतात. समोरासमोर हात धरलेल्या बायकांची एक जोडी ज्या दुसऱ्या समोरासमोर बायका हात वर धरून उभ्या आहेत त्या ओळीमधून जातात आणि परत तशाच उभ्या राहतात, मग दुसरी जोडी, मग तिसरी. आणि हे सर्व भरभर करायचे. या खेळामधे पण खूप मजा येते.
या खेळाचे नाव माहित नाही. यामध्ये बायका टिचक्या वाजवून एकेक पाय वर करुन गोल गोल नाचून गाणे म्हणतात. ते गाणे पुर्णपणे आठवत नाही. "साळुंकी साळुंकी, तुझी माझी........... पगडी फु बाइ पगडी फु