श्री. गजानन महाशय,
आपण लोकमत चे का? तसे लोकमतकडून आम्ही काही विषेश आपेक्षा करत नाही (कारण मला वाटते की लोकांच्या मतापेक्षा काँ. नेत्यांचे मत असे त्याचे नाव हवे).
लोकमतने हा सामाजिक मुद्दा उचलल तर चांगलेच होईल. असे अनेक मुले आपण पाहतो ज्यांनी काम केले नाही तर त्यांच्यावर उपासमारिची वेळ येईल. अशा मुलांसाठी सर्वांनीच काही ना काही केले पाहिजे, लोकशाहिच्या आधारस्तंभातील घटक असणाऱ्या लोकमतने सुद्धा! आम्हीही आपापल्या परिने मदत करू. पण आरक्षाणाचे समर्थन करणाऱ्या लोकमताने उपाशी राहण्याची वेळ येणाऱ्या मुलांमध्येही केवळ मागसमर्गीय मुलांनाच आहार देण्याचा आग्रह धरू नये म्हणजे झाले.
एकंदरीत हा विषय असा आहे की धरले तर चावते आणि सोडले तर पळते. त्या मुलांचे पोट कसे भरणार हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे हे मात्र खरे.
आपला,
(चिंतित) बाळू