जाधवांची मुलाखत मी कालच ऐकली होती. पूर्ण तासभर. जात-पात व आरक्षणाच्या काही बाबतीत ते थोडी टोकाची भूमिका घेत होते. मला वाटत की माणूस ज्या परिस्थितीतून जातो त्याबाबत थोडा हळवा व कडू/गोड होऊ शकतो. हे अतिशय नैसर्गिक आहे. त्यांची काही व्यक्तिगत आकस/ मतं असणे व ती दुसऱ्यांवर लादणे यात खूप फरक आहे.
सर्व बाबतीत मला असे टोक दिसले नाही असे नमूद करावेसे वाटते. त्यामुळे पुणे विद्यापीठाचे कुठलेही नुकसान मला दिसत नाही.
एक दोन ठिकाणी मुलाखत कर्त्याला जातीपाती बद्दल प्रश्न विचारण्यात अधिक रस आहे असे मला वाटून गेले. (माझी चूक असू शकते)
असो, नरेंद्र जाधवांचे अभिनंदन व माहिती आणि ऐकिव दुव्याबद्दल एकलव्य आणि उद्धट रावांचे आभार.