वावा, बाहेर मुसळाधार पाऊस मुगाची खिचडी हवीच.
माझ्या मते, मुगाची खिचडीत बासमती तांदूळ वापरल्यास त्याची मजा येत नाही असे वाटते. चिन्नोर किंवा आंबेमोहोरच हवा.
ही खिचडी थोडी मऊच हवी. किंचित पेजेसारखी. नागपूरला आमच्या घरासमोरील रामकृष्ण आश्रमात प्रसाद म्हणून विशिष्ट दिवशी अशी खिचडी देतात. त्यात गाजर, कोबीशिवाय ते वांगेही टाकतात. उत्तम लागते. सोबत पाएश (पायस, तांदळाची खीर).
पण घरी वर ह्या खिचडीवर तळलेली दह्यातली मिरची आणि भरपूर फोडणीहवी. सोबत एखादी आंबटगोड कोशिंबिर, पापड, कुरडया पापड्या वगैरे वगैरे.