प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. वरील अनुभवांवरून सगळे बँक कर्मचारी उर्मट असतात असा गैरसमज करून घेऊ नका. कित्येक वेळा ग्राहकांची मग्रुरी त्यांना सहन करावी लागते. आमच्या एका ग्राहकाला आरडाओरडा करायला कसलेही कारण पुरेसे असे. छोट्या छोट्या कारणासाठी तो बँकेच्या चेअरमनकडे तक्रार करी. त्याची ब्याद लवकर टळावी म्हणून स्वतः चीफ मॅनेजर त्याच्या सेवेला हजर व्हायचे.हा मग इतर ग्राहकांकडे शेखी मिरवी की शंभर रुपये शिल्लक ठेवूनही  मी सेवा कशी घेतो बघा.