चित्तरंजनजी, काका म्हटले म्हणून राग नाहि ना आला?
काहीतरीच काय.जेहेत्ते असे आहे. मला काही मनोगतींचा आजोबा आहे. तुम्ही दुसरे कुठले लाडिक संबोधन वापरले असते तरीही प्रतिसादात फरक पडला नसता.
तुम्ही इतर कविता वृत्तात लिहिल्या आहेत. पण ह्या कवितेत वृत्त पाळता आलेले दिसत नाही. असो.
मो. रा. वाळंब्यांच्या शुद्धलेखन प्रदीपात तुम्हाला वृत्तांसंबंधी जुजबी माहिती मिळेल. ह्याशिवाय अनेक पुस्तके आहेत. माधवराव पटवर्धनांचे एक पुस्तक आहे. पण सराव हेच सगळ्यात मोठे मार्गदर्शन.
चित्तरंजन भट