पहिले चार शेर विशेष आवडले. सहज आहेत, ओघवते आहेत.

होतो तसाच आहे मी
अजुनी तुझाच आहे मी...

वाव्वा.

आशा कसली, वेडच हे!
वेडापिसाच आहे मी...

फार छान. वा. खालचा मिसरा काय आला आहे वरच्या मिसऱ्यावर.

आयुष्याचा जुगार हा
हरलो बराच आहे मी...
छान.

मैफल सरली केव्हाची
बसलो उगाच आहे मी...

वाव्वा. फारच छान. टॉमस मूरच्या मला आवडणाऱ्या

I feel like one

Who treads alone
Some banquet-hall deserted,

ह्या ओळींची आठवण झाली. पूर्ण कविता इथे वाचता येईल.

सुंदर गझल अजबराव.

चित्तरंजन
प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..
प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..
प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..