आज विमान प्रवासाच्या निमित्ताने दोन आलेले अनुभव फार बोलके आहेत. दोन्ही अनुभव टॅक्सी चालकांचे आहेत. एक होता इराकी, तो म्हणाला सद्दाम चांगला होता जरी तो एक हुकूमशहा होता. त्याने आपसात भांडणे कधी लावली नाहीत. पण आमचे लोक इराणमुळे आज भांडत आहेत. तो एक चांगला सुजाण इराकी नागरिक वाटला जरी तो इराक मध्ये नव्हता. दुसरा अनुभव, मुंबई मधून पुण्याला येताना, तो टॅक्सी चालक म्हणाला, सोनिया ही गांधीजींची नातेवाईक ना? नेहरूंशी तिचा काय संबंध? ती तर गांधी आहे. हे आमच्या इथल्या लोकांचे ज्ञान. अरे देवा हि आमच्या लोकाची राजकीय कुवत. आणि इथे आपण काय चर्चा करतोय...
जिथे मुळातच चुकीची शिकवण दिली जाते तिथे राजकारण आणि आपण यात काय साध्य होणार असे वाटून गेले क्षणभर...