डाळ तांदुळ शिजत आले की वरून फोडणी द्यायची. या फोडणीमध्ये भरपूर कढिपत्ता घालणे. ही खिचडी जो तापातून उठला आहे त्याला तोंडाला चव येण्यासाठी देतात.
डाळ तांदुळ शिजले की त्याबरोबर वेगळ्या वाटीमध्ये फोडणी घेतात आणि ती खिचडीला लावून खातात. या फोडणीमध्ये भरपूर तिखट व भरपूर लसूण पाकळ्या घालतात.
तुरीच्या डाळीची पण करतात. यामध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो, व कच्चे दाणे, तिखट, मीठ व गोडा मसाला घालतात.