मोकळेपणाने आपली भूमिका प्रकट करणाऱ्या आणि व्य नि द्वारा विचार कळविणाऱ्या मनोगतींना मनःपूर्वक धन्यवाद.
तसेच चर्चेत सहभागी झालेल्या इतरही - सर्वसाक्षी/दिगम्भा/टीकाराम/अन्य कोणी - सज्जनांचे आभार.
झटकन् मुद्द्यावर येतो -
वरुण यांनी कंपूबाजीच्या व्याख्येच्या स्पष्टतेच्या आवश्यकतेविषयी सर्वप्रथम विचार मांडला. इतर अनेकांनीही त्यास स्पर्श केलेला आहे.
जयन्ता५२ यांनी "कंपू" हा शब्द वाईट अर्थाने न घेता त्यास समान आवडीनिवडी असलेल्यांचा गट या अर्थानेही घ्यावा असे सुचविले आहे. असे समान गुणविशेष असणाऱ्यांनी एकत्र यावे ही आनंदाचीच गोष्ट आहे. मात्र कंपूबाजी हे विशेषण वापरताना मृदुलाकृत व्याख्या मनात होती. बहुतेक प्रतिसाद हे अशीच काहीशी व्याख्या मनात धरून होते असे म्हणावयास हरकत नाही.
सोयीसाठी पुन्हा मांडतो -
- केवळ आपल्या कंपूतील लोकांविषयी चांगले लिहिणे.
- केवळ आपल्या कंपूतील लोकांना प्रतिसाद देणे
- नावडत्या व्यक्तीला कंपूतील सगळ्यांनी मिळून _ठरवून_ वाईट प्रतिसाद देणे.
२४ जणांची मते याक्षणापर्यंत नोंदविलेली आहेत. ज्यांची मते असंदिग्ध वाटली त्यास अर्धे वजन दिलेले आहे.
त्यावरून ७५% जणांना मनोगतावर कंपूबाजी आहे असे वाटते.
तर ८.३३% जणांना आपण कंपूत आहोत याची खात्री आहे.
किमान ८७.५०% जणांना आपण कोणत्याही कंपूत नाही याची खात्री आहे.
ह्म्म्म.... अंदाज - जवळपास सर्वांना (९०% +) असे वाटते की ते average वाहनचालकापेक्षा चांगली गाडी चालवितात. असाच काहीसा स्वतःच्याच पायात खोडा घालणारा निष्कर्ष वरील प्रश्नांच्या उत्तरांवरून मिळेल.
तपशील/खुलासे -
कंपूबाजी आहे मी कंपूत आहे
उद्धट १ ०
भटका १ ०
टग्या १ ०
वरुण १ ०
सन्जोप १ ०
मैथिली १ ०
तात्या १ १
लेखकु १/२ ०
जयन्ता५२ १/२ १/२
सुखदा १ ०
छाया १ ०
नीलकांत १ ०
महेश १ ०
मीरा ० ०
साती १ १
विक्रम १ १/२
प्रियाली १ ०
लिखाळ १ ०
मृदुला ० ०
भोमेकाका ० ०
श्रावणी ० ०
अभिजित १ ०
कुशाग्र १ ०
एकलव्य ० ०
तात्पर्ये/निष्कर्ष/मतपरिवर्तन/मतप्रदर्शन आपण यापुढेही करू शकता. माझे निष्कर्ष वेळ मिळेल तसे मांडेनच. मला स्वतःला नक्कीच थोड्या आणखी insights मिळाल्या.